आनाळा-( प्रतीनिधी) भाजपा महिला मोर्चा आघाडीच्या परंडा तालुका अध्यक्षपदी सौ प्रियंका निशीकांत क्षिरसागर यांची निवड झाल्याबद्दल आनाळा येथील युवा प्रतिष्ठाण अनिल शिंदे मित्र परिवार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. आनाळा ता परंडा येथील जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थापक सचिवा सौ प्रियंका निशीकांत क्षिरसागर यांची नुकतीच परंडा तालुका भाजपा महिला मोर्चा आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे हि निवड मा आ सुजितसिह ठाकुर यांच्या आदेशाने परंडा तालुका अध्यक्ष श्री अरविंद रगडे यांनी केली आहे या निवडी बद्दल आनाळा येथे जिजाऊ चौकामध्ये युवा प्रतिष्ठाण व सामाजीक कार्यकर्ते अनिल भाऊ शिंदे मित्र परिवाराच्या वतीने यशस्वी उद्योजक सामाजिक कार्यकर्ते तथा एस व्ही पाटोळे असोशिएटसचे मालक श्री विक्रम पाटोळे व अनिल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला या वेळी महाराष्ट्र पोलीस लक्ष्मण क्षिरसागर, केशव पवार, साजिद शेख, पत्रकार निशीकांत क्षिरसागर, भाऊ जाधव, प्रशांत शिंदे, मेजर शिवाजी क्षिरसागर, मा सरपंच तानाजी अंकुश, प्रशांत क्षिरसागर ,शुभम जाधव, बापु जाधव ,महादेव शिंदे, कुंडलीक रिटे ,सोन्या शिंदे, खंडु , जेजेराम गिलबिले ,गणेश बैरागी, यांच्यासह युवा प्रतिष्ठाण जिजाऊ चौक, अनिल भाऊ शिंदे मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपसस्थित होते.
- Home
- परंडा/भूम/वाशी
- नुतन भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष प्रियंका क्षिरसागर यांचा ; युवा प्रतिष्ठाण अनिल शिंदे मित्र परिवार यांच्या वतीने सत्कार…