परंडा नगरपालिका वगळता ; तहसील कार्यालय, गटशिक्षण कार्यालय येथे जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा.

परंडा (प्रतिनिधी) येथील तहसील कार्यालय येथे दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी जागतिक दिव्यांग दिन दिव्यांग बांधवांच्या समवेत तहसील कार्यालयामध्ये साजरा करण्यात आला.

यावेळी संजय गांधी विभाग प्रमुख नायब तहसीलदार सौ. पूजा गोरे यांनी दिव्यांग दिनाचे महत्त्व, दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.  परंडा तहसील कार्यालयामार्फत राबविण्यात आलेले उपक्रम,वाढीव दिव्यांग अनुदान यासंदर्भात माहिती सांगितली. तहसील कार्यालय परंडा पुरवठा विभाग मधील नायब तहसीलदार  पुरवठा विभागामार्फत दिव्यांग व्यक्तीव कुटुंबातील सदस्य यांना अन्नधान्य देण्यात येईल. ज्यांना रेशन कार्ड नाही अशांनी अर्ज करावे त्यांना  रेशन कार्ड देण्यात येईल असे दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांना सांगितले, तसेच नायब तहसीलदार विजयकुमार बाडकर यांनी आमचे तहसील कार्यालय व प्रशासन दिव्यांग सेवेसाठी सदैव तत्पर राहील.दिव्यांगाच्या सेवा पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे सांगितले.दिव्यांग उद्योग समूहाचे राज्याध्यक्ष तानाजी घोडके यांनी दिव्यांग दिन व दिव्यांग बांधवांना येणाऱ्या समस्यांचा लेखाजोखा प्रशासन समोर मांडला तसेच शहर व परंडा तालुक्यात विविध ठिकाणी जागतिक दिव्यांग दिन  साजरा करणयात आला यामध्ये गटशिक्षण कार्यालय, पंचायत समिती कार्यालय व काही ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या मागणीसाठी दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने दिव्यांग कल्याण विभाग सचिव तुकाराम मुंढे साहेब यांच्याकडे पाठपुरावा करत होते संघटनेच्या या पाठपुराव्याला यश आले.

तहसील कार्यालय येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग संस्था प्रतिनिधी व दिव्यांगाचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी दिव्यांग उद्योग समूहाचे अध्यक्ष तानाजी घोडके तालुकाप्रमुख तानाजी सांगडे,  दिव्यांग उद्योग समूहाचे प्रसिद्धी प्रमुख संतोष कुलकर्णी दादा माने, लाला गाढवे, नागनाथ नरुटे, व इतर सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय गांधी विभागातील भांडवलकर, सहाय्यक ग्राम महसूल अधिकारी तानाजी भोजने, ऑपरेटर अण्णा मगर यांचे सहकार्य लाभले असा जागतिक दिव्यांग दिन उत्साहात पार पडला.

error: Content is protected !!