बार्शी:(माझं गांव माझं शहर) बार्शी शहरातील बेदराई विहिरीजवळ एका विद्यार्थ्याने फोन लावायच्या बहाण्याने मोबाईल मागितला व मोबाईल घेऊन पळवला मोबाईल, बार्शी पोलिसांनी तत्परता दाखवत सीसीटीव्हीच्या आधारे अवघ्या काही तासांत शोधून काढला आणि मूळ मालकाच्या ताब्यात दिला आहे.
दिनांक १३/१०/२०२५ रोजी नागेश रमेश पतंगे (राहणार, बारंगुळे प्लॉट, बार्शी) यांचा मोबाईल एका अनोळखी व्यक्तीने फोन लावायचा आहे, असे सांगून घेऊन पळवला होता. या घटनेनंतर नागेश पतंगे यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधला.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन, मा. DySP सायकर साहेब आणि पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने तपास सुरू केला. पोलीस हेडकॉन्स्टेबल #अमोलमाने आणि पोलीस कॉन्स्टेबल #सचिनदेशमुख यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली आणि पळवून नेणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला. पोलिसांच्या या जलद कार्यवाहीमुळे सदर व्यक्तीला पकडण्यात यश आले आणि मोबाईल यशस्वीरित्या परत मिळवण्यात आला.
मोबाईल मालक नागेश रमेश पतंगे यांना त्यांचा मोबाईल परत मिळाल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले असून, या व्यक्तीविरुद्ध कोणतीही तक्रार द्यायची नसल्याचे त्यांनी पोलिसांना कळवले आहे. बार्शी पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे नागरिकांच्या सुरक्षेबद्दलचा विश्वास अधिक वाढला आहे.