परंडा(तानाजी घोडके) भूम-परंडा तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पूरग्रस्त नागरिक आणि शेतकरी यांच्या व्यथा जाणून घेतल्या. या मोठ्या संकटात बाधितांना धीर देण्याचा प्रयत्न करत आहे.
आपल्या भागात आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतीचे माती वाहून गेल्या मुळे भरून न येणारे नुकसान झाले आहे. यावेळी शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेऊन शासन स्तरावरून मदत मिळावी, यासाठी माझ्या वतीने पाठपुरावा करण्यात येईल. व या संकटाच्या काळात त्यांच्यासोबत भक्कमपणे उभे आहोत हा विश्वास दिला.
यावेळी प्रवीण रणबागुल यांच्या वतीने या संकटाच्या काळात सामाजिक दायित्व म्हणून पूरग्रस्त बाधितांना रोख रक्कम स्वरूपात मदत दिली..
अशा परिस्थितीत सरकारने संवेदनशीलत दाखवत “सरसकट ओला दुष्काळ” तात्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा. केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी ..!
You must be logged in to post a comment.