उद्योजक रामचंद्र पवार यांना २०२५ चा मराठवाडा रत्न पुरस्कार जाहीर .

परंडा दि १४ (माझं गांव माझं शहर) : – परंडा – पुणे येथील सुप्रसिद्ध उद्योजक रामचंद्र पवार यांना २०२५ चा ” मराठवाडा रत्न ” पुरस्कार जाहिर झाला आहे . मराठवाडा सेवक प्रतिष्ठान महाराष्ट्र पुणे च्या वतीने दिला जाणारा पुरस्कार मराठवाडा मुक्ती दिन दि १७ सप्टेबर २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड पुणे येथे वितरित होणार आहे . सदरील पुरस्कार वितरण ह . भ . प . गुरुबाबा औसेकर महाराज यांचे हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यकंटराव गायकवाड (से . नि . ) सचिव जलसंपदा विभाग महाराष्ट्र असून प्रमुख पाहूणे , पृथ्वीराज बी . पी . अ . आयुक्त म .न.पा पूणे व डॉ . शाशिकांत महावरकर अ . पोलिस आयुक्त पिंपरी – चिंचवड हे राहणार असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिनकर बळीराम चौधरी यांनी पत्राद्वारे कळविले आहे . मराठवाडा मुक्ती दिनाचे औचित्य साधून उद्योजक रामचंद्र पवार यांना ” मराठवाडा रत्न २०२५ हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याने रामचंद्र पवार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Content is protected !!