आनाळा( प्रतीनिधी) परंडा तालुक्यातील आनाळा येथील रॉयल पब्लिक स्कूल या शाळे चा पालक – विद्यार्थी मेळावा मोठया उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री निशिकांत क्षिरसागर व संस्थेच्या सचिव सौ प्रियंका निशिकांत क्षिरसागर होते या वेळी अध्यक्ष निशिकांत क्षिरसागर यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकापेक्षा पालकांची भुमिका महत्वाची असून विद्यार्थ्याच्या बौद्धीक वाढीसाठी मुलांच्या आहारात प्रोटीन कॅल्शिअम व्हिटॅमीन मिळणाऱ्या अन्नाबरोबर कडधान्य फळे पालेभाज्यांचा जास्तीत जास्त वापर केला पाहीजे यामुळे मुलांच्या बौध्दिक क्षमता वाढण्यास मोठी मदत होते यामुळे पालकांनी मुलांच्या आहार व अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहीजे असे मत निशीकांत क्षिरसागर यांनी व्यक्त केले या वेळी संस्थेच्या संस्थापक सचिव सौ प्रियंका क्षिरसागर यांनाही उपस्थित पालकांच्या समस्येचे निराकरण केले पालकांनीही शाळेबद्दल समाधान व्यक्त केले या वेळी मोठ्या प्रमाणात माता पालक उपसस्थित होते. पालक मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री हनुमंत जगताप शिक्षक श्री अशोक घाडगे शिक्षीका सौ उषा क्षिरसागर सौ प्रिया देशामुख, सौ कविता जगताप,सौ करिश्मा शेख, सौ मैना मोरे, सौ रुतुजा बोंद्रे, सौ ज्योती शिंदे ,कु श्वेता क्षिरसागर, कु प्रतीक्षा वामन, कैलास थोरात, बाबासाहेब गायकवाड, भाऊसाहेब हिवरे, आंबादास गायकवाड, औसरे आदीनी परिश्रम घेतले.