भ्रष्टाचार कृती समितीला जशास तसे उत्तर देणार . – मा. नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर .

1752241504023

परंडा दि ११ : – परंडा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची इ .डी . मार्फत चौकशी करून त्यांना निलंबित करावे यासाठी परंडा तालुक्यातील पाच पक्षिय भ्रष्टाचार विरोधी कृती समितीने दि . १० जुलै २०२५ रोजी परंडा शहर बंदची हाक देऊन झालेल्या भ्रष्टाचाराची यादी निवेदनात देऊन तहसिलदार परंडा यांना दिले .
      हा विषय माजी नगराध्यक्ष यांनी चांगलाच मनावर घेतला व परंडा बंद करणाऱ्या कृती समितीला जशास तसे उत्तर देणार . तसेच कृती समिती मधील पुढाऱ्यांनी केलेले अतिक्रमण दि . १४ जुलै २०२५ पर्यंत नाही काढले तर कृती समितीच्या आंदोलनापेक्षा दहापट काय पन्नासपट सोमवारपासून म्हणजे १४ जुलै पासून तीव्र आंदोलन करणार असा खरपूस भाषेत समाचार घेत पत्रकार परिषद घेऊन खमंग ईशारा दिला .
      माजी नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर यांनी पत्रकारा समोर माजी मंत्री डॉ . तानाजीराव सावंत यांनी मंजूर केलेल्या दीडशे कोटीची विकास कोम झाली व सुरू आहेत . सदरील सर्व कामाचा आलेख मांडला . असा विकास कृती समितीतल्या पाच पक्षिय पुढाऱ्यानी करून दाखवावा . निष्फळ आणि भाष्कळ भाषा वापरू नये असा सज्जड सल्ला दिला . सोमवार दि १४ जुलै पासूनच्या आंदोलनावर ठाम भूमिका घेतली जाईल याची दखल सर्व पत्रकारांनी घ्यावी असे सांगितले .
      या पत्रकार परिषदेच्या वेळी माजी नगरसेवक वाजिदभाई दख्खणी, शाम मोरे सह शिंदे गटाचे माजी नगरसेवक मोठया संख्येने हजर होते .

Leave a Reply

error: Content is protected !!