बावची रस्त्याची दुरावस्था ! शाळा, महाविद्यालय, आय टी आय विद्यार्थ्यांची , ज्येष्ठ नागरिक शिक्षक यांची सकाळची सुरुवात चिखलात?

परंडा (प्रतिनिधी) शहरातील बावची रोड या ठिकाणी महाराणा प्रताप सिंह चौक ते शांतीनगर या रोडचे काम चालू असल्याने खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात आला नाही.खाजगी मालकीच्या जमिनीतून रस्ता आहे परंतु रिमझिम पावसाळ्याच्या दिवसात खुप चिखल झाला आहे ,विद्यार्थ्यांना व नागरिकांना चिखलातून खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे पर्यायी रस्ता उपलब्ध करून न दिल्यामुळे नागरिकांना याचा खूप मोठा त्रास होत आहे. या रस्त्याने अनेक खेडे गावे शाळा महाविद्यालय कॉलेजेस आयटीआय कॉलेज, लोक वसाहती कॉलनी इत्यादी शेकडो लोकांच्या रहदारीचा रस्ता आहे हा रस्ता परंडा शहरात जाणाऱ्या रस्त्यावर खूप मोठे चिकल खड्डे असल्यामुळे नागरिकांना याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे

या रस्त्याने प्रवास करताना सकाळी दोन दिवसांपूर्वी रिमझिम पाऊस चालू आहे त्यामुळे रस्ता खूप खोलवर चिखलात बुडालेला आहे त्यामुळे या रस्त्यावर अनेक नागरिक विद्यार्थ्यांची वाहने पडली व दुखापत झाली त्याचबरोबर मोटरसायकल सायकली कार चालक यांना कसरतीचा सामना करावा लागत आहे तरी या रस्त्याला ज्या ठेकेदारांनी काम घेतले आहे त्या संबंधित ठेकेदाराने पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांच्या विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!