परंडा येथे राज्यव्यापी “चक्काजाम” आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येणार आहे.

Img 20250723 wa0034

परंडा ( दि २३ ) शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी या सह विविध मागण्या साठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दि २४ जुलै रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार अशी माहिती जिल्हा संपर्क प्रमुख नागनाथ नरूटे पाटील यांनी दिली आहे ,

     या आंदोलनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे अवाहन संपर्क प्रमुख नागनाथ नरुटे पाटील यांनी केले आहे ,

शेतकरी कर्जमाफी व इतर न्याय्य मागण्यांसाठी…

शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग, शेतमजूर, मेंढपाळ, मच्छीमार व कामगार, शक्तिपीठ मार्ग संदर्भातील शेतकरी बांधवांनो,
आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे!

✅ शेतकरी कर्जमाफी तत्काळ जाहीर करणे
✅ “सातबारा कोरा” आदेशांची तात्काळ अंमलबजावणी
✅ इतर प्रलंबित मागण्यांवर निर्णय
✅ शक्तिपीठ मार्ग त्वरित रद्द करणे
✅ आंबी पोलिस ठाणे येथे कर्तव्यावर पोलिस दिव्यांगाना हानमार झाल्यास दिव्यांग अधिनियम कायदा नुसार फआर,व संबंधित आरोपींवर कारवाई केली जात नाही
🛑 म्हणूनच, दिनांक २४ जुलै २०२५ (गुरुवार) रोजी
सकाळी ८:०० ते ११:०० या वेळेत
राज्यव्यापी “चक्काजाम” आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येणार आहे.

स्थळ – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परंडा
वेळ सकाळी 10 वाजता
✊ भूम-परंडा-वाशी तालुक्यांतील शेतकरी, कामगार दिव्यांग बांधव व अन्य बांधवांना या लढ्यात सामील होण्याचे आवाहन! करण्यात येत आहे

आपला एकत्रित आवाजच बदल घडवू शकतो!
शांततेच्या मार्गाने, ठामपणे – हक्कांसाठी उभं राहूया!

  बुधवार दि २३ जुलै तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले आहे परंडा येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात सकाळी ८ ते ११ या कालावधीत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे ,यावेळी दयानंद बनसोडे , महाविर शिंदे , अतूल गोफणे , धर्मराज नरूटे, तुकाराम ओव्हाळ , जेजेराम कांबळे , दामू मोहरे , संजय लटके , मकबुल सय्यद , उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!