टाळ मृदंगाचा गजर आणि भानुदास एकनाथ हरिनामाचा जयघोष करीत आषाढी वारीसाठी निघालेल्या संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे शहरात आगमन

परंडा ता.३० ( तानाजी घोडके) “पंढरीशी जारे आल्यांनो संसारा !दिनाचा सोयरा पांडुरंग ! वाट पाहे उभा भेटीची आवडी! कृपाळु तातडी उताविळ!भानुदास एकनाथ नामाचा जयघोष ,टाळ-मृदंगाचा गजर हरिनामाचा जयघोष करीत आषाढी वारीसाठी निघालेल्या श्री क्षेञ पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे रविवारी ता.२९ जुन रोजी सायंकाळी सहा वाजता, शहराचे प्रवेशद्वार असलेल्या नाथ चौकात आगमन झाले.मोठ्या भक्तिभावात जल्लोषात पालखीचे स्वागत करीत,दर्शनासाठी भाविक नागरीकांनी गर्दी केली होती.
आषाढी वारीसाठी पंढरीच्या विठुरायाच्या भेटीची ओढ लागलेल्या पैठणच्या शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे श्री क्षेत्र पैठणहुन मित्ती जेष्ठ बुधवार १८ जुन रोजी प्रस्थान झाले आहे.मजल दरमजल करीत सांयकाळी सहा वाजता पालखी सोहळा दाखल झाला.पालखीचे आगमन होताच मोठी आतिषबाजी करण्यात आली. मानकरी मोहन देशमुख,मुकुंद देशमुख,मधुकर देशमुख,पालिका मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली यांनी पुष्पवृष्टी करीत स्वागत केले.यावेळी माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर,शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित पाटील,उद्योजक राम पवार,पोलीस निरिक्षक दिलीपकुमार पारेकर,व्हाईस आॕफ मीडिया जिल्हाउपाध्यक्ष प्रकाश काशीद,दिलीप रणभोर, अॕड अनिकेत काशीद, प्रमोद वेदपाठक,महेंद्र देशमुख,संतोष देशमुख,सुनिल देशमुख आदिंसह नागरीकांची उपस्थिती होती.
पंढरीची वारी हा अवघ्या वारकरी सांप्रदायाचा मोठा आनंद सोहळा असुन,लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी अतुर असलेले वारकरी ऊन,वारा,पडणाऱ्या पावसात भिजत पायी वारी करीत आहेत.या पालखी सोहळ्याला ४२६ वर्षाची मोठी परंपरा आहे.पालखीप्रमुख १४ वे नाथवंशज रघुनाथबुवा नारायण पालखीवाले, योगेशबुवा गोस्वामी,रखमाजी महाराज,श्रीकृष्ण चोपदार,अशोक चोपदार आहेत.या पालखी सोहळ्याचे पालखी मार्गावरील मिडसांगवी,पारगाव घुमरे,नांगरडोह,कव्हेदंड,या चार ठिकाणी रिंगण सोहळा पार पडतो.शहरातील,जय भवानी चौकात गणेश मंडळाच्यावतीने वारक-यासांठी चहा,नाष्ट्याची,औषधगोळ्यांची सोय करण्यात आली होती.शहरातील विठ्ठलभक्तांनी वारक-यांसाठी ठिकठिकाणी भोजनाची सोय केली होती.तसेच कल्याणसागर समुहाच्यावतीने सराफ व्यापारी मनोज चिंतामणी यांनी पुष्पवृष्टी करीत चहा,अल्पोहार दिला.महात्मा फुले चौकात हंसराज गणेश मंडळाने चहा,अल्पोहार दिला.पालखीमार्गावर भाविकांनी चहाची सोय केली होती.”आमचीया कुळीचे,विठ्ठल दैवत,कुळधर्म समस्त,विठ्ठल देव” य पालखी सोहळ्यात पैठण ते पंढरपूर वैद्यकीय अधिकारी यांच्यासह १० जणांचे आरोग्य पथक वारीत सेवा देत आहेत.शासनाचे एक आरोग्य पथक,पालखी संस्थानचे दोन टँकर,शासकीय पाण्याचे टँकर आहेत.या पालखीसोबत पुढे १० व मागे ३० आशा एकुण ४० दिंड्या आहेत.असे पालखीप्रमुख रघुनाथबुवा यांनी सांगितले .टाळ मृदंगाचा गजरात वैष्णवांची मांदियाळी भगव्या पताका फडकावित तल्लीन झाली होती.पढंरपुरात येणाऱ्या सर्व पालखी सोहळ्यात नाथांच्या पालखीला तिसरा मान आहे.नाथांच्या पालखीचा “काला”विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पांडुरंगासमोर होतो.शहरात ठिकठिकाणी महिलांनी,नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.शहरात ठिकठिकाणी मोठी आतिषबाजी करण्यात आली.शहरातील,मंगळवार पेठेतील मोहन देशमुख, मुकुंद देशमुख यांच्या वाड्यावर परंपरेनुसार पालखी सोहळा मुक्कामी असतो या ठिकाणी भजन,किर्तन,हरीजागर होवुन सोमवारी ता.३० रोजी सकाळी दहा वाजता मुंगशीमार्गे ता.माढा हद्दीतुन पंढरपूरकडे पालखी मार्गस्थ झाले.

Leave a Reply

error: Content is protected !!