संगणक शिक्षण हे आधुनिक जीवनाचे भक्कम आधारस्तंभ असून, “संगणक कोर्सेस – काळाची खरी गरज”
परंडा(संपादकीय) आजच्या वेगाने बदलणाऱ्या डिजिटल युगात संगणक शिक्षण हे केवळ एक पर्याय राहिलेले नाही, तर ती प्रत्येकासाठी अत्यावश्यक गरज बनली आहे. शासनाच्या विविध योजना, बँकिंग व्यवहार, शैक्षणिक प्रक्रिया, नोकरीच्या संधी आणि व्यवसाय व्यवस्थापन – या सर्व क्षेत्रांत संगणकाचे ज्ञान अनिवार्य झाले आहे. ग्रामीण भागातही आता डिजिटल क्रांती पोहोचली असून, ऑनलाइन सेवा, ई-गव्हर्नन्स आणि डिजिटल व्यवहारांचा…