अतुल कुलकर्णी या पोलीस अधिकाऱ्यास निलंबित करा :-माहिती अधिकार कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

परंडा(माझ गाव माझ शहर ) जालना जिल्ह्यातील शेतकरीपुत्र लोकशाही मार्गाने न्याय मागत असताना उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद अतुल कुलकर्णी यांनी फिल्मी स्टाइलने पायात बूट असताना स्वातंत्र्यदिनी पाठीमागून उडी मारून लाथ घातली आहे. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या सहकारी पोलिसांना निलंबित करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यातील शेतकरी चौधरी यास लोकशाही मार्गाने न्याय मागत असताना तहसिलदार तथा कारी दंडाधिकारी समाधानकारक न्याय मिळत नसल्याने त्या शेतकऱ्याला नाईलाजाने टोकाची भूमिका घ्यावी लागली. चौधरी यांनी कुटुंबासह पालकमंत्री पंकजा मुंडे यांना ही सर्व हकिकत सांगण्यासाठी जात होते. त्यावेळेस डीवायएसपी यांनी त्या शेतकऱ्यास पालकमंत्र्यांना भेटण्यास जाऊ नको. तरी शेतकरी पालकमंत्र्यांना भेटण्यास चालले होते. त्यांना तीन पोलीस व उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद अतुल कुलकर्णी यांनी व तीन पोलिसांनी हात धरले होते. या निवेदनावर फारुख शेख, कानिफनाथ सरपणे, फारुख मुलाणी, अमित आगरकर, शिवाजी करने, प्रशांत नांगरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!