परंडा दि १३ : – परंडा येथील रामभाऊ पवार उद्योग समुहाने शहरात भव्य असे सुर्यप्रभा हॉस्पिटल उभा केले . या हॉस्पिटल मध्ये एक्स रे , सोनोग्राफी , डायालिस , व सर्वरोगावर उपचार होत असून कमतरता फक्त रुगण वाहिका आंबुलन्स ची कमतरता होती ती भरून काढली दि १३ जुलै रोजी हॉस्पिटलला उद्योजक रामभाऊ पवार यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली त्याचे उद्घाटन जेष्ठ विचारवंत तुकाराम गंगावणे , डॉक्टर मनोज शिंदे उद्योजक नानासाहेब पवार , प्रमोद बोराडे व ह भ .बालाजी बोराडे , गणेश सुबगडे यांचे हस्ते करण्यात आले . यावेळी टोंपे इंजिनियर , डॉ. अंकुश शिंदे , व सुर्यप्रभा मल्टी हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी वृंद हजर होते .
आरोग्य विषयक संपूर्ण सुखसुविधा उपलब्ध असल्याने परंडा पंचक्राशीत समाधान व्यक्त होत आहे .
काम चांगलं केलेआहे हार्दिक शुभेच्छा
खूप छान काम करतात पवार साहेब