बार्शी-कुर्डुवाडी रोडवरील बायपास चौकात भीषण अपघात..

बार्शी(प्रतिनिधी) बार्शी-कुर्डुवाडी रोडवरील बायपास चौकात ०६ जुलै रोजी सकाळीं एक भीषण अपघात झाला. एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीवरील १३ वर्षीय लहान मुलगी (श्रावणी उबाळे ) जागीच ठार झाली, व गाडीवरील दोन तरुण रणजित उबाळे, संदीप उबाळे जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी जगदाळे मामा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे

दुचाकीचा क्रमांक MH45A P1891 असून ती थेट बसखाली गेली.मुलीचे आडनाव उबाळे असून ती चिचगाव गावची रहिवासी होती.या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!