परंडा -शहरातील एकमेव ट्रस्टी जय भवानी गणेश मंडळाची १९८२-८३ मधील श्री मुर्ती आजही कायम आहे.

परंडा, ता. २ ( तानाजी घोडके ) शहरातील एकमेव रजि. ट्रस्टी १९८० स्थापना असलेल्या जय भवानी गणेश मंडळाने ५० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या गणेशोत्सवाची परंपरा जपली आहे. गणेशोत्सवातून सामाजिक संदेश देत समाजप्रबोधनपर उपक्रम हाती घेतले आहेत. दरवर्षी गणेश जयंतीला रक्तदान शिबिरही घेतले जाते. मिरवणुकीत लेझीम पथकासह, हलगी, टाळ पथक अशा पारंपरिक वाद्यांसह मिरवणुकीची प्रथा आजही कायम राखली आहे. मंडळाची १९८२ पासून जुनीच सुबक आकाराची तीन फूट “श्री” ची मूर्ती आजही कायम आहे. १९७६-७७ मध्ये जय भवानी गणेशाची स्थापना तत्कालीन गल्लीतील मुलांनी कुणाच्या तरी पडलेल्या घरात तरवटाच्या पालापाचोळ्याचे छप्पर करीत केली होती. पाऊस वादळी वारा आल्यास १० दिवसांत तीन चार वेळा जागा बदलावी लागत असल्याचे ज्येष्ठ मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर १९८१-८२ मध्ये तत्कालीन नागरिकांनी एकत्र येत आगरकर कुटुंबीयांच्या घरासमोर मोकळ्या जागेत १० दिवस पत्र्याचे शेड मारून गणेश स्थापना सुरू केलेली प्रथा आजतागायत रुढ झाली आहे. याच जागेत मंडळ ट्रस्ट झाल्यानंतर कायमस्वरूपी शेड उभारले आहे.माञ,यंदाच्या लोकवर्गणीतुन,भाविकभक्तांच्या दानशुरतेनुसार पञ्याचे शेड काढुन मंदीर बांधकाम उभारणी करण्याचा मानस मंडळाचा सुरु आहे. आजमितीस मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष बबन आगरकर आहेत.

विविध पारितोषिकांचे मानकरी –
या जय भवानी गणेश मंडळाच्यावतीने अन्नदानासह, वृक्षसंवर्धन संदेश देणे, समाजप्रबोधनपर सांस्कृतिक, धार्मिक, पाणी आडवा पाणी जिरवा, झाडांचे वाटप, मुलगी शिकवा, प्लॅस्टिक हटवा, यांसह विविध उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत.यंदा बारा जोतीर्लिंग दर्शन देखावा व महादेव पींडीवर पाणीफेक देखावा सादरीकरण तयारी सुरु आहे. या मंडळास जिल्हास्तरावर अनेक मानाच्या ढाली, बक्षिसे मिळाली आहेत. गणेशोत्सवात यापुर्वी पर्यावरणाचे संरक्षण करा, असा देखावाही सादर केला आहे.
प्रत्येक वर्षी उत्सवाची कार्यकारिणी करण्यात येते. १९९०-९५ मध्ये काही दानशूर व्यक्ती व गणेशभक्तांनी मिळून मंदिर उभारणीसाठी कल्याणसागर शाळेलगत १० गुंठे जागा खरेदी केली आहे. या ठिकाणी गणेश मंदिर व सभागृह उभारण्यासाठी आजही हालचाली सुरूच असले तरी जुन्याच जागेत पञाशेड काढुन भाविकभक्तांसाठी मंदीर उभारण्याच्या हलचाली गतिमान करणार असल्याचे मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सांगत आहेत.

या मंडळाचा पडद्यावर चित्रपट दाखवण्याचा इतिहास !
पूर्वी या जय भवानी मंडळाच्यावतीने पडद्यावर टुरिंग टॉकीजद्वारे विविध धार्मिक, मराठी, हिंदी चित्रपट दाखवण्याची पद्धत होती. धार्मिक, ऐतिहासिक नाटके व्हायची. आजमितीस ही प्रथा बंद पडली आहे.दहा दिवस उत्सव काळातील विविध सांस्कृतिक,समाजप्रबोधनपर कार्यक्रम प्रथा कमी होवु लागली आहे.यंदा लहान मुलांचे,महिलावर्गांचे उत्साह वाढविण्यासाठी अखेरच्या तीन दिवसात विविध प्रकारचे कार्यक्रम व मनोरंजनात्मक, समाजप्रबोधनपर स्क्रिनवर मराठी,हिंदी चिञपट आयोजीत केले असल्याचे मंडळाचे पंकज नांगरे यांनी सांगितले. गणेशोत्सवासाठी ज्येष्ठ नागरिकांसह मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष बबन आगरकर,हनुमंत हातोळकर,प्रकाश काशीद,संतोष भालेकर,नागेश काशीद,सुधीर मस्के, पंकज नांगरे, विशाल काशीद, आण्णा लोकरे,राहुल काशीद, सनी काशीद, विनायक काटवटे, अनिकेत काशीद, कुणाल जाधव, योगेश मस्के,आकाश काशीद,अमित आगरकर, वैभव मस्के,सुहास आगरकर, आदित्य नांगरे, बॉबी काशीद,ओंकार काशीद,सुबोध देशमुख,शंतनु कुलकर्णी, रोहन आगरकर, करण काशीद, मयुर जाधव,उदय काशीद, अतुल काशीद, प्रतिक मस्के, सुजय जाधव, राहुल आगरकर, गणेश आगरकर आदींसह मंडळाचे कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!