परंडा : ७२ ग्रामपंचायतींचे सरपंच पद आरक्षण जाहीर ; ७२ पैकी ३६ ग्राम पंचायतवर महीला राज.

Paranda sarpanch

परंडा (तानाजी घोडके) तालुक्यातील ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे सन २०२५ ते २०३० पर्यंतचे आरक्षण ठरवण्यासाठी दि. १० जुलै रोजी तहसील कार्यालयातील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ७२ सरपंचाचे ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे काढण्यात आले. आरक्षण सोडतीमध्ये अनेक प्रस्थापित सरपंचांच्या ग्रामपंचायत आरक्षणात गेल्याने अनेकांना धक्का बसला आहे, तर काही जणांच्या आरक्षणात असलेल्या ग्रामपंचायतीचे आरक्षण आता ओपन झाले असल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे.

  • अनुसूचित जाती (४) देऊळगाव, भांडगाव, लोणी, वागेगव्हाण.
  • अनुसूचित जाती महिला (५) : कात्राबाद, कुंभेजा, जाकेपिंपरी, गोसावीवाडी (डोंजा ), कार्ला
  • अनुसूचित जमाती महिला (१) टाकळी
  • इतर मागास प्रवर्ग (१०) रोहकल, उंडेगाव, कंडारी, पिंपरखेड, काटेवाडी, येणेगाव, बावची, आनाळा, इनगोंदा, शिराळा.
  • इतर मागास प्रवर्ग महिला ( ९ ) : आलेश्वर, खासापुरी, मलकापूर, वडनेर, धोत्री, कपिलापुरी, पिंपळवाडी, चिंचपूर खुर्द, कुंभेफळ.
  • सर्वसाधारण(२२) : देवगाव बुद्रुक, आसू, लोहारा, खासगाव, रत्नापूर, कौडगाव, दहिटणा, घारगाव, जेकटेवाडी, जवळा नि., अरणगाव, आवारपिंपरी, वाकडी, खंडेश्वरवाडी, रुई, ढगपिंपरी, कोकरवाडी, नालगाव, भोत्रा, चिंचपूर बुद्रुक, शेळगाव, मुगाव.
  • सर्वसाधारण महिला (२१) हिंगणगाव बुद्रुक, कांदलगाव, कुक्कडगाव, पाचपिंपळा, साकत खुर्द, देवगाव खुर्द, वाटेफळ, रोसा, राजुरी, डोमगाव, साकत बुद्रुक, डोंजा, तांदुळवाडी, भोजा, सोनारी, सिरसाव, हिंगणगाव खुर्द, पांढरेवाडी, पारेवाडी, अंदोरा, खानापूर.

परंडा येथील तहसील कार्यालय सभागृहात ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण काढण्यासाठीची बैठक बोलवण्यात आली होती. प्रभारी उपविभागीय अधिकारी जयवंत पाटील, तहसीलदार निलेश काकडे यांच्यासह निवडणूक विभागाचे व महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली.ओबीसीसाठी २७ टक्के आरक्षण सोडण्यात आले आहे. जाहीर आरक्षण सोडत कार्यक्रमाला तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी, आजी, माजी व इच्छूक सरपंच, उपसरपंच व ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते. निवडणूक विभागाच्यावतीने पुन्हा आरक्षण सोडत जाहीर झाल्याने अनेक प्रस्थापितांना धक्का बसला असून, याबाबत एकच चर्चेला उधाण आले आहे. आगामी काळात ५ वर्षांसाठी ७२ पैकी ३६ ग्राम पंचायतवर महीला राज प्रस्थापित होणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!