परंडा पोलिसांनी सापळा रचून पकडला १० लाखांचा गुटखा..

Images+3

माझं गांव माझं शहर(परंडा) धाराशिव- परंडा ते करमाळा रोडवर सोमवारी (दि.२१) १० लाख रुपयांच्या अवैध गुटख्याची वाहतूक होत असताना अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाई करून हा गुटखा पकडला.
    यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, आरोपी सागर मधुकर गायकवाड (वय २८ वर्षे, रा. पिंपरखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर) हा व्यक्ती दिनांक २१ जुलै रोजी दुपारी २ वाजता परंडा ते करमाळा रोडवर नायरा पेट्रोल पंपाजवळ परंडा येथे महाराष्ट्रात शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याची वाहतूक करत असताना आढळून आला.

   यावेळीरॉयल ७७७ सुंगधीत तंबाखु ४० बॅग व हिरा पानमसाला ८० बॅग असा एकुण 10,00,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल विक्रीसाठी वाहतुक करत असताना कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा आयुक्त व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन ही वाहतूक केली जात होती.

    अन्न सुरक्षा अधिकारी लातुर चार्ज धाराशिव यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी विठ्ठल सठवाजी लोंढे (वय 50 वर्षे, व्यव अन्न सुरक्षा अधिकारी लातुर चार्ज धाराशिव) यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे परंडा येथे भा.न्या.सं. कलम 123,223, 274, 275 सह अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम 59 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!