परंडा:-०१ ऑगस्ट २०२५ रोजी “दिव्यांग” तपासणी संपन्न- अध्यक्ष तानाजी घोडके

परंडा(प्रतिनिधी) तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र मिळावे त्याचबरोबर तालुक्यातील दिव्यांग प्रमाणपत्र पासून वंचित राहू नये, दिव्यांगाच्या व्यथा जाणून समजून घेऊन दिव्यांग हित जोपासणे या उद्देशाने दिव्यांग उद्योग समूहाचे अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या सततच्या पाठपुरायानुसार परंडा येथे १ऑगस्ट २०२५ रोजी दिव्यांग तपासणी शिबिर पार पडले.यामध्ये 45 दिव्यांग नागरिकांची तपासण्या करण्यात आल्या आहेत. यासाठी जिल्हा शैल्य चिकित्सक अधिकारी धाराशिव उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय परंडा यांच्या वतीने हा कॅम्प यशस्वी पार पाडण्यात आला.

या शिबिरामध्ये अस्तिव्यंग दिव्यांग , मतिमंद दिव्यांग, अंध अशा एकूण 45 दिव्यांग नागरिकांची तपासणी करण्यात आली. धाराशिव येथून विशेष तज्ञ डॉ सुहास शिंदे डॉ कृष्णा स्वामी, डॉ ज्योती कल्याणी यांनी कामकाज पाहिले हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी दिव्यांग उद्योग समूहाचे तानाजी घोडके स्वतः उपस्थित राहून दिव्यांग व्यक्तींची चौकशी करतात व कामाचा पाठपुरावा करतात.यावेळी शहर प्रमुख गोरख देशमाने उत्तम शिंदे संघटनेमधील पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व उपरुग्णालय एक्स रे विभाग बापू खताळ , भराटे आदीसह कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

error: Content is protected !!