परंडा (प्रतिनिधी) तालुक्यातील कात्राबाद – सोनगिरी ग्रामपंचायत सरपंचपदी परवेज पटेल यांची निवड बिनविरोध करण्यात आली. यापूर्वीच्या सरपंच लक्ष्मीबाई कोळी यांनी राजीनामा दिल्यामुळे मंडळ अधिकारी दुर्गाप्पा पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रक्रिया पार पडली.
यावेळी नूतन सरपंच परवेज पटेल यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला. यावेळी उद्योजक राजाभाऊ शेळके, उपसरपंच गणेश कोकाटे,ग्रामपंचायत सदस्य मंगल शेळके, निलावती गरड, लक्ष्मीबाई कोळी, बाकर अली पटेल, गोकुळ गरड, ब्रम्हदेव शेळके, इलियास पटेल, राहुल गरड, प्रविण गरड, अक्षय गरड, सोहेल सय्यद, दिपक गरड, पोलिस पाटील महादेव मोरे, ग्रामपंचायत शिपाई गोपीनाथ बोराडे, आप्पा गरड, परशुराम कोळी, तलाठी ज्ञानेश्वर गुळमिरे, ग्रामसेवक अशोक शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पटेल यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करुन फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला.