अनाळा येथे ७९ स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा .

परंडा (माझं गांव माझं शहर )तालुक्यातील अनाळा येथे ७९ वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात संपन्न झाला . प्रारंभी न्यू हायस्कुल व जि.प . शाळेच्या विद्यार्थी – विद्यार्थीनी ची गावातून फेरी काढण्यात आली होती .जय जवान – जय किसान , भारत माता कि जय च्या घोषनांनी परिसर दणाणून गेला होता . न्यू हायस्कुल शाळेत अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले . ग्रा.पं. कार्यालयात सरपंच अंबिका क्षिरसागर , महाराष्ट्र ग्रामिण बँकेत शाखा व्यवस्थापक रवी चौधरी , विविध कार्यकारी सोसायटीत चेअरमन दशरथ हिवरे , जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक मुबारक पठाण , पशुवैद्यकिय दवाखान्यात पशु वैद्यकिय अधिकारी शेख , तलाठी कार्यालयात तलाठी युवराज हाके यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले . न्यू हायस्कुल शाळेत गुणवंत विदयार्थ्यांना स्वातंत्र्य दिना निमित्त अध्यक्ष दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले . ग्रा पं कार्यालयात सरपंच अंबिका क्षिरसागर यांच्या हस्ते अंगणवाडी सेविका हसीना शेख , व आशासेविका अनिता क्षिरसागर यांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . स्वातंत्र्य दिना निमित्त कार्यक्रमास माजी उपसरपंच दादा फराटे , नितीन शिंदे , प्रोग्यान फाऊंडेशन च्या तालुका समन्वयक नौशाद शेख , बचतगट प्रेरिका रेणुका सुर्वे , अंगणवाडी सेविका वंदना मोरे , , मुख्याध्यापक जयकुमार भोरे , माजी सैनिक अंगद सातपुते , राजेंद्र शिंदे , मारुती सातपुते , मेजर औसरे , भालचंद्र क्षिरसागर , माजी मुख्याध्यापक पी .टी लिमकर , वसंत हिवरे ग्रा. प .सदस्य विनोद कदम , तानाजी अंकुश’ ,माजी पं. स .उपसभापती अर्जुन शिंदे , शालेय समिती चे अध्यक्ष रेवननाथ शिंदे , पत्रकार निशिकांत क्षिरसागर ,अलिम शेख , साजीद शेख , अझहर शेख , प्रतिष्ठीत नागरिक बाबू गोडसे , तात्यासाहेब चोबे , हनुमंत क्षिरसागर , कालिदास पवार ,समाधान गोडसे , दादा चव्हाण , राजेंद्र गडकर यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!