गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या अनुषगांने परंडा पोलिसांच्या वतीने शांतता समिती बैठक , शहरात रूट मार्च.

परंडा(माझं गांव माझं शहर) शहरात आगामी काळात होणारे सन उस्तवा निमित मा.पोलीस अधिक्षक धाराशिव शफकत आमना, यांच्या मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल चोरमले यांचे उपस्थितीत दिनांक २३.०८.२०२५ रोजी पोलीस ठाणे परंडा येथे गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद या अनुषगांने शांतता समिती बैठक, पोलस पाटील व गणेश मंडळाचे अध्यक्ष व सचिव यांचे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमांत मा.उपविभागीय पोलीस अधिकारी भूम श्री अनिल चोरमले यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच श्री आसाराम चोरमले, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, यांनी १) आगामी सण-उत्सव २) डी – जे मुळे होणारे दुष्परिणाम ३)हिंन्दु–मुस्लिम सण एकोप्याने साजरे व्हावे यांचे अनुषंगाने घ्यावयाची दक्षता तसेच गणेशमुर्ती ही पर्यावरणपुरक असावी तसेच गावातील प्रत्येक मंडळाने गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे सण शांततेने व आनंदात पार पाडण्याचे आव्हाहन केले.

परंडा शहरातील नगरपालिकाचे कर्मचारी पंडित कुलकर्णी यांनी मिरवणूकी दरम्यान येणारे अडथळे तसेच रस्त्यावरचे खड्डे लवकरात लवकर व्यवस्थित करून घेवू असे आश्वासन दिले. तसेच उपजिल्हा रूग्णालयाचे वैदयकिय अधिकारी डॉ. अबरार पठाण यांनी ध्वनी प्रदुषण / डी. जे. व लेझर लाईटचे दुष्परिणाम विषयी जनजागृती केली तसेच सहा. अभियंता महावितरण संदीप गोरे यांनी गणेशत्सोवा दरम्यान व कोणत्याही प्रकारचा खंड अगर मिरवणूकी दरम्यान येणारे लाईट चे पोल तसेच तारा यांची व्यवस्थित काळजी घेवून मिरवणूकिस कसलीही अडवणूक होणार नाही असे सांगितले.

परंडा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार पुजा गोरे यांनी पर्यावरणपुरक गणेशमुर्तीची स्थापना करावी यावेळेस गणेशोत्सव हा आनंदात व ध्वनीप्रदूषण व जलप्रदुषण मुक्त करू असे विचार मांडले तसेच मा. उपविभागीय अधिकारी अनिल चोरमले यांनी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सणानिमित्त मिरवणूकीमध्ये डी. जे. व लेझर लाईट न वापरता पांरपारिक वादंयाचा वापर करून शांततेत पार पाडव्यात तसेच राज्यातील सार्वजनिक हा राज्य महोत्सव साजरा करण्याबाबत शासनाने घेतला आहे. त्या अनुषगांने विविध स्पर्धा उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असुन उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर पुरस्कृत करण्यात येणार आहे तरी परंडा तालुक्यातील सर्व गणेश मंडळाने या स्पर्धेत भाग घ्यावा असे आव्हाहन केले.

शांतता समितीचे सदस्यांनी व प्रतिष्ठित व्यक्तीने आपले अडी अडचणी व विचार मांडले. परंडा येथील मौलाना जफर अली काझी, हाफिज गुलाम गौस व हफिज निजाम शेख यांनी मुस्लिम धर्माचा ईद-ए-मिलाद सण एैण गणपती उत्सव दरम्यान येत असल्याने गणपती उत्सवात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, गणेशोत्सव आनंदात व शांततेत पार पडावा म्हणून त्यांनी ईद-ए-मिलाद हा सण दिनांक ०८.०९.२०२५ रोजी साजरा करण्याचे महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे व सामाजिक एकोपास वृद्धीगंत होईल याचे उदाहरण घालून दिले त्याबद्दल मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक परंडा यांनी त्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री आसाराम चोरमले, पोलीस निरीक्षक परंडा यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री प्रवीन सिरसट सहा. पोलीस निरिक्षक परंडा यांनी केले. कार्यक्रमास मा. उपविभागीय पोलीस अधिकारी भूम श्री अनिल चोरमले, मा. पोलीस निरिक्षक श्री आसाराम चोरमले, पोलीस ठाणे परंडा, सपोनि प्रवीन सिरसट, पोलीस उपनिरिक्षक श्री खरात, गोपनीय पोलीस हवालदार- नितिन गुंडाळे, सुर्यजित जगदाळे, पोह- विश्वनाथ शिंदे, भालचंद्र काकडे , भुजंग अडसूळ तसेच नगरपालिकाचे कर्मचारी पंडित कुलकणी, उपजिल्हा रूग्णालय परंडा वैदयकिय अधिकारी डॉ. अबरार पठाण, सहा. अभियंता महावितरण संदीप गोरे, नायब तहसीलदार पुजा गोरे, परंडा शहारातील व ग्रामीण भागातील गणेश मंडळाचे पदाधिकरी, प्रतिष्ठित व्यक्ती, परंडा तालुका सर्व पत्रकार वर्ग, व सर्व परंडा तालुका पोलीस पाटील हजर होते.

Leave a Reply

error: Content is protected !!