परंडा(प्रतिनिधी) संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व, थोर विचारवंत, साहित्यिक, समाजसुधारक, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि प्रखर राष्ट्रभक्त, थोर क्रांतिकारक, असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे साजरी करण्यात आली. भाजपा नेते मा.आ.श्री. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजपा ग्रामीण मंडळाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, शहर मंडळाध्यक्ष उमाकांत गोरे, ॲड. जहीर चौधरी, विकास कुलकर्णी, युवा नेते समरजीतसिंह ठाकूर, सारंग घोगरे, रामकृष्ण घोडके, सुजित परदेशी, शहाजीआप्पा पाटील, शिवाजीराव पाटील, अजित काकडे, डॉ. अमोल गोफणे, डॉ. नागेश शिंदे, संपत्ती भोळे, जयंत सायकर, किरण कवटे, धनंजय काळे, मनोहर पवार, सिध्दीक हन्नुरे, आदर्श ठाकूर, गौरव पाटील, अजिम हन्नुरे, व्यंकटेश दिक्षित, विवेक ठक्कर, हिमालय वाघमारे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.