आदर्श शाळा जि.प.शाळा कार्ला येथे शिवश्री रामभाऊ पवार यांच्या तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप..

परंडा(प्रतिनिधी) 3 जुलै 2025 , गुरूवार रोजी जि प प्राथमिक शाळा कार्ला येथे शेतकरी पुत्र शिवश्री रामभाऊ पवार( पवार उद्योग समूहाचे सर्वेसर्वा )यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनोखा उपक्रम हार, फुले , केक न स्वीकारता वही पेन भेट द्या या उपक्रमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कार्ला शाळेमध्ये शाळेतील 5 वी ते 7 वी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यामध्ये विद्यार्थ्यांना वही, पेन, कंपास देण्यात आलेयावेळी उद्योजक रामभाऊ पवार साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व शालेय साहित्य वाटप केल्याबद्दल मुख्याध्यापक खरात सर यांनी आभार मानले. वाढदिवस एक शैक्षणिक चळवळ निर्माण करण्याचा मानस पवार साहेबांचा आहे या कार्यक्रमासाठी शिक्षण विस्तार अधिकारी दादासाहेब घोगरे,केंद्रप्रमुख सचिन केमदारने , पै.कैलास झिरपे सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.शिवशाहीर शरद नवले यांनी सर्वांचे आभार मानले..

Leave a Reply

error: Content is protected !!