परंडा(माझं गांव माझं शहर) ग्रामीण भागामध्ये सेवा सुविधा मिळाव्या रस्ते चांगले व्हावे याकरिता देशपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. परंतु परंडा तालुक्यातील देऊळगाव ते हिंगणगाव रस्ता नेहमीच चिखलाने माखलेला दिसतो. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दुर्दशा कायम आहे या रस्त्याकडे ना पुढार्याचे लक्ष ना शासनाचे लक्ष. खेडी एकमेकाला जोडली गेली पाहिजे नद्या एकमेकांना जोडल्या गेल्या पाहिजे देवाण-घेवाण वाढली पाहिजे असे महाराष्ट्राचे व्हिजन असताना देखील हे चित्र परांडा तालुक्यातील देऊळगाव हिंगणगाव रस्त्याचे आपल्याला पाहायला भेटते या रस्त्याकडे त्वरित बांधकाम विभाग किंवा जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी लक्ष देऊन हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, जेणेकरून विद्यार्थी नागरिक यांना येण्या- जाण्याजोगा रस्ता करावा अशी मागणी हिंगणगाव व देऊळगाव गावातील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
- Home
- परंडा/भूम/वाशी
- देऊळगाव – हिंगणगाव रस्त्याची दुर्दशा कायम: याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष