परंडा (माझं गांव माझं शहर) :- परंडा तालुक्यातील देवगाव (बु) येथील नागरिक हे गेल्या अनेक दिवसापासून सर्दी ,खोकला ,ताप व उलट्या होणे या व्याधीने बेजार झाले आहेत ,याला एकमेव कारण म्हणजे गावातील अशुद्ध पाणी ,देवगाव (बु ) येथे एकूण पाच हात पंप आहेत त्यापैकी कदम वस्ती येथील एकमेव हातपंप हा पिण्याचे पाणी म्हणून वापर करण्या योग्य आहे .परंतु हातपंपा भोवती उकंडे जनावरांचा वावर यामुळे येथे दुषित पाणी साठा होत आहे. हेच पाणी या हातपंपामध्ये उतरले जात आहे. त्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे , वेळीच आरोग्य विभाग व ग्रामपंचायत यांनी हातपंपा भोवतालची स्वच्छता करून गावातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे बंद करावे , गावामध्ये ग्रामपंचायत मार्फत जंतुनाशक फवारणी करणे देखील गरजेचे आहे . सार्वजनीक ठिकाणी डास ,चावने यांचा देखील प्रभाव वाढलेला आहे . या बाबीकडे प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे व उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
- Home
- परंडा/भूम/वाशी
- देवगाव (बु ) येथील नागरिक साथीच्या आजाराने बेजार : गावातील एकमेव हातपंप घाणीच्या विळख्यात