परंडा (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या स्वसंपादीत उत्पन्नातील 5 टक्के दिव्यांग सेस योजनेअंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता समाजकल्याण विभागामार्फत पुढील योजना राबविण्यात येत आहेत.मतिमंद व्यक्तींना आर्थिक सहाय्य व
अतितीव्र दिव्यांगांच्या पालकांना आर्थिक सहाय्य या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांनी विहीत नमुन्यातील पूर्ण प्रस्ताव गटविकास अधिकारी,पंचायत समिती सर्व यांच्यामार्फत जिल्हा समाजकल्याण अधिकारी,समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद धाराशिव यांचेकडे 26 सप्टेंबर 2025 पर्यंत सादर करावा, असे आवाहन दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र , राज्यअध्यक्ष तानाजी घोडके तसेच जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.
अर्जाचा विहीत नमुना,अटी-नियम तसेच आवश्यक कागदपत्रांची यादी सर्व गटविकास अधिकारी (पंचायत समिती) कार्यालयात उपलब्ध असून, अर्जाचे नमुने dharashiv.nic.in तसेच www.zpdharashiv.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.