ग्लोबलमध्ये साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
परंडा(प्रतिनिधी) साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ग्लोबलच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष गोरख मोरजकर व प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव शिवमती आशाताई मोरजकर उपस्थित होत्या. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी कादंबरी, पोवाडे, कवी लेखन, कविता संग्रह ,लघु कथा, पटनाट्य आदी साहित्य हे समाजाच्या उद्धारासाठी प्रसिद्ध केले. त्याचबरोबर…
