- मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास अटी-शर्थीसह एक दिवसाची परवानगी मिळाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करु नये, असे आदेश काल दिले होते. मात्र आता जरांगे यांना दिलासा मिळाला असून त्यांना विविध अटी – शर्थीसह एका दिवसासाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी मिळाली आहे.
- सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी जरांगे यांना मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी दिली आहे. पोलिसांनी फक्त पाच हजार आंदोलकांसह आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. आंदोलनाची वेळ ही सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच वेळेसाठी दिलेली असून त्यानंतर आंदोलकांना मैदानात थांबता येणार नाही. याचबरोबर पोलिसांनी शनिवार, रविवार व शासकीय किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आंदोलनासाठी परवानगी देण्यात येणार नसल्याची माहिती दिली आहे.