परंडा (माझं गांव माझं शहर) श्रावणमासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.येथील आर्ट ऑफ लिव्हींगचे योगशिक्षक दिलीप पोळ यांच्या निवासस्थानी गुरुवार दि.२१ रोजी पंडीत स्वामी कल्याण आनंद यांनी पौराहित्य करीत उपस्थितांना सामाजीक,धार्मिक संदेश दिला.यावेळी भाविकांनी गर्दी केली होती.
श्रावणमासामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे संपूर्ण भारतभर रुद्रपूजेचे आयोजन केले जाते. सर्वदूर भागांमध्ये संस्थेचे स्वामी व पंडितजी, दिवसाला शेकडो किलोमीटरचा प्रवास करून गावागावात जाऊन शास्त्रोक्त पद्धतीने पूजा संपन्न करतात.सर्व सामान्य लोकांना समजेल अशा सरल भाषेत आध्यात्म आणि भक्तीचा प्रसार करतात.रुद्र पूजा पुरातन असून हजारो वर्षांपासून केली जाते.
श्रावण महिन्यात या पूजेचे विशेष महत्त्व असते.यावेळी स्वामी कल्याण आनंद मार्गदर्शन करताना म्हणाले की,रुद्र पूजन हे भगवान शिवाच्या आराधनेतील सर्वात प्रभावी आणि पवित्र पूजन मानले जाते.यामुळे जीवनातील दुःख, अडथळे, नकारात्मक शक्ती दूर होतात.या पूजेमुळे आरोग्य उत्तम राहते, मन:शांती मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. रुद्राभिषेक केल्याने घरामध्ये सुख-शांती, ऐश्वर्य आणि समाधान टिकून राहते. असे मानले जाते की, या पूजेच्या प्रभावाने पितृदोष, ग्रहदोष, वाईट स्वप्ने आणि अचानक येणारे संकटे दूर होतात. जो भक्तभाविक श्रद्धेने ही पूजा करतो त्याच्या आयुष्यात समृद्धी, संतुलन आणि अध्यात्मिक प्रगती घडते.या रुद्रपुजेचे आयोजन दिलीप पोळ यांनी केले होते.रुद्रपुजेनंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी किशोर काळे, अशोक गोडगे, सुशांत पोळ रामदास ठोंगे, प्रकाश काशीद, राजाभाऊ लोखंडे, भाऊसाहेब साबळे,श्रीराम टेकाळे, राजेंद्र चौधरी,अतुल मारकड , अतुल गोरे सचिन डुकरे,दादा गुडे आदिसह विविध क्षेञातील मान्यवर,महिलांची मोठी उपस्थिती होती.