परंडा पोलीस स्टेशनचे नुतन पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांचा व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार.

परंडा (प्रतिनिधी) परंडा पोलीस स्टेशन येथे नूतन पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारलेले आसाराम चोरमले यांचा व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेची व्याप्ती व कार्य याबाबत काशीद यांनी सखोल माहिती सागितली पत्रकारा सोबत चर्चा , संवाद करण्यात आली. पत्रकारांच्या सोबत आम्ही नेहमी तत्पर राहू व न्याय देण्यासाठी पत्रकारांच्या बाजूने उभे आहोत असे आश्वासन पोलीस निरीक्षक आसाराम चोरमोले यांनी पत्रकार बांधवांना दिले.

यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद तालुका अध्यक्ष मुजिब काझी तालुका कार्याध्यक्ष प्रमोद वेदपाठक तालुका सचिव तानाजी घोडके फारुक शेख श्रीराम विद्वत संतोष शिंदे रावसाहेब गायकवाड राहुल बनसोडे आधी सह पत्रकार बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!