परंडा (प्रतिनिधी) शहरात दि.२६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस आजी माजी सैनिक व अर्ध बल सैनिक संघटना तसेच क्रांती करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.
कारगिल विजय दिवस ‘ 1999 मध्ये लडाखमधील उत्तर कारगिल जिल्ह्यातील पर्वताच्या शिखरावर पाकिस्तानी सैन्याला त्यांच्या ताब्यातील स्थानांवरून हुसकावून लावण्यासाठी कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून दरवर्षी 26 जुलै रोजी भारतात हा दिवस साजरा केला जातो.
परंडा येथे क्रांती करिअर अकॅडमीचे विद्यार्थी व आजी-माजी सैनिक संघटना यांनी मिळून बावची चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी रॅली काढण्यात आली, रॅलीमध्ये कारगिल विजयाच्या व भारत मातेच्या घोषणा देण्यात आल्या, त्या ठिकाणी सर्व शहीद झालेल्या जवानांना मानवंदना देऊन श्रद्धांजली वाहण्यात आली,
या कार्यक्रमाला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पारेकर सर, नवनाथ आप्पा जगताप, मेघराज दादा पाटील ,आनंद मोरे ,संदीप खोसे पाटील, संभाजी पाटील, तुकाराम चव्हाण ,मेजर सातपुते, मेजर धनाजी नरसाळे , मेजर सोनवणे, क्रांती अकॅडमीचे संचालक पांडुरंग कोकणे तसेच आजी माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते , कार्यक्रमाचे सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली,