परंडा २५ (प्रतिनिधी) उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर अबरार पठाण यांचा मुलगा मुफज्जल पठाण व डॉक्टर आनंद मोरे यांचा मुलगा आदित्य मोरे या दोघांनी वैद्यकीय पूर्व नीट परीक्षेत मोठे यश संपादन केले आहे डॉ अबरार पठाण डॉ निलोफर गुण घेऊन पुढील शिक्षण ला- पठाण या दाम्पत्यांनी उपजिल्हा तूर येथील शाहू महाविद्यालयात रुग्णालयात नोकरी सांभाळून मुलगा घेतले वैद्यकीय पूर्व परीक्षा मुफज्जल पठाण याच्या शिक्षणाकडे जेई व नीट मध्ये त्याने ६०२ घेतले आई-वडिलांनी दिलेली साथ यामुळे मुफज्जल पठाण याने दोन्ही ग्रुपमध्ये पहिल्याच वर्षी टॉपवर आला आहे.
डॉ आनंद मोरे यांचा आदित्य आनंद मोरे याने वैद्यकीय पूर्व नीट परिक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. आदित्य मोरे याचे प्राथमिक शिक्षण लोअर केजी कल्याण सागर बालवाडी येथे तर युकेजी संत मीरा पब्लिक स्कूल येथे पुढील पहिली ते तिसरी जिजामाता प्राथमिक विद्यालय परंडा येथे झाले. त्यापुढील चौथी ते पाचवी लॉर्ड कृष्णा इंग्लिश मीडियम स्कूल परंडा येथे पूर्ण केले. पुढे पाचवी ते नववी शिक्षणासाठी बार्शी येथील सेंट जोसेफ इंग्लिश मिडीयम स्कूल बार्शी येथे पूर्ण केले. त्यानंतर नववी ते बारावी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल अतिग्रे कोल्हापूर येथे पूर्ण करून शाळेच्या शिक्षकांचा आशीर्वाद व अनुभव पाठीशी घेऊन पहिल्याच प्रयत्नात बारावी नंतरची नीट परिक्षेत ५५४ मार्क घेऊन यश संपादन केले. त्याने २३ लाख विद्यार्थ्या मधून देशात ओबीसी रैंक ऑल इंडिया ४५४० व ऑल इंडिया रैंक ओपन १०५७७ असा आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील चांगल्या शासकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रवेश निश्चित झाला आहे. आई-वडिलांनी स्वतःचे आरोग्य क्षेत्र, दवाखाना आणि शासकीय सेवा सांभाळत मुलाच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिले. आई डॉ रमा आनंद मोरे व वडील डॉ आनंद गोरख मोरे यांनी स्वतः च्या व्यस्त दैनंदिन जीवन क्रमातून त्याला योग्य मार्गदर्शन केले आहे. आजोबा रिटायर्ड पशुवैद्यकीय अधिकारी डॉ गोरख बाबुराव मोरे व आजी मीना गोरख मोरे यांचे विशेष लक्ष होते.