तुळजापूर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धाराशिव जिल्हा प्रवक्ते या पदावर विशाल साखरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विशाल साखरे यांच्या खांद्यावर जिल्हा प्रवक्ते या पदाची धुरा सोपवले आहे जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार नाही पक्षाचा आमदार नसला तरी धाराशिव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद खूप मोठे आहे पक्षाचा धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी विचार समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार तालुक्यातील तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गाव पातळीवरील संघटनात्मक बांधणी करून आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांचे नेतृत्व अधिक बळकटी करणार असे वक्तव्य नूतन जिल्हा प्रवक्ते विशाल साखरे यांनी केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते