परंडा-सोनारी, दि १५(माझं गांव माझं शहर) अखंड महाराष्ट्रासह अंध्रा व कर्नाटक येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र सोनारी येथील काळभैरवनाथ रथोत्सव काल मोठ्या उत्साहात पार पडला .
कंडारीच्या कावड व पालखीचे १ च्या सुमारास मंदीर परिसरात अगमन झाले . देवास पाण्याची धार घालण्यात आली . दुपारी २ वाजता श्रीकाळभैरवनाथाची महाआरती करण्यात आली . त्यानंतर मुख्य रथ उत्सवास सुरुवात झाली . मंदीराचे मुख्य पुजारी धुपबत्ती घेवून पुढे निघाले . मागोमाग सांगोल्याची काठी , देवाचा हत्ती , घोडा, कंडारीची मानाची पालखी व श्री नाथांचा रथ अशी वाजत गाजत मिरवणूक निघाली . भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण केली . जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून निघाला . मिरवणूक मुख्य प्रवेशद्वारातून बाजारपेठ , मुख्यमार्ग , लहुबाई चौक , कंडारी फाटा , रेस्ट हऊस मार्गे निघाली . परत मुख्य रस्त्याने मुख्यद्वारातून काळभैरवनाथाचा रथ मंदीरा समोर येवून विसावला . यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती मानाच्या काठ्या, कावडी रथ मार्गावर रथाला भेटवण्यासाठी थांबल्या होत्या . गुलाल व खोबरे उधळत भाविक भक्त गुलालात न्हाऊन निघाले होते .