परंडा तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जल्लोष ; आर.बी. ग्रुप व नालंदा समूहाकडून फुले-आंबेडकर संयुक्त जयंती उत्साहात..!

परंडा (माझं गांव माझं शहर, दि.१४) : परंडा शहरासह संपूर्ण तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली.

आर.बी. ग्रुप व नालंदा समूहाच्या वतीने माजी नगरसेवक राहुल बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात पार पडली.

कार्यक्रमाची सुरुवात बौद्ध वंदनेने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी आमदार राहुल मोटे यांनी आयोजक राहुल बनसोडे यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. या भव्य जयंती सोहळ्यास माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रणजित पाटील, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, विश्वजित पाटील, उपनगराध्यक्ष समरजीत ठाकूर, जिजाऊ ब्रिगेडच्या आशा मोरजकर, पाणीपुरवठा सभापती रमेश परदेशी, गौतम लटके, नगरसेवक डॉ. अब्बास मुजावर, सत्तार पठाण, अॅड. जाहिर चौधरी, नगरसेवक अनिल शिंदे, मदन सद्दीवाल, दीपक थोरबोले, श्रीहरी नाईकवाडी, जयदेव गोफणे, नाना पवार, मुकुल देशमुख, काका साळुंके, शाम मोरे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक राहुल बनसोडे, नगरपरिषदेच्या सार्वजनिक बांधकाम व मागासवर्गीय कल्याण समितीच्या सभापती रत्नमाला राहुल बनसोडे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बिभिषण खुणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस घनशाम शिंदे, जयंती समारोह समितीचे अध्यक्ष प्रतीक बनसोडे, जीवन बनसोडे, ऋषिकेश बनसोडे, रुपेश बनसोडे, अरणजीत नागटिळक, भिजीत नलवडे, सिद्धांत वाघमारे, बाळासाहेब माकणीकर, नियामत हानुरे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या जयंती सोहळ्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा जागर करून सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला.

error: Content is protected !!