परंडा (प्रतिनिधी) – शहरात आगामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याच्या पार्श्वभूमीवर आर. बी. ग्रुप व नालंदा समूह यांच्या संयुक्त विद्यमाने जयंती समारोह समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी इंजिनिअर प्रतिक सिद्धार्थ बनसोडे यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी अजय बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे.
ही समिती राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक राहुल बनसोडे तसेच नगरसेविका आणि सार्वजनिक बांधकाम व मागासवर्गीय कल्याण समिती सभापती सौ. रत्नमाला राहुल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जयंती उत्सव भव्य व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला.
समितीच्या कार्यकारिणीमध्ये खजिनदारपदी रुपेश बनसोडे व गणेश मदने यांची निवड करण्यात आली असून सहखजिनदारपदी अभिजित नलवडे यांची निवड झाली आहे. सचिवपदी हर्षवर्धन पाटील व प्रशांत मदने, तर सहसचिवपदी सुजित कांबळे व सुजित सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.
सरचिटणीसपदी ॲड. ऋषिकेश बनसोडे यांच्यासह अनिकेत गोंजारे, विजय दनाने, रणजीत काळे, सिद्धांत वाघमारे आणि रणजीत नागटिळक यांचा समावेश आहे.
संघटक म्हणून घनश्याम शिंदे, सिद्धार्थ बनसोडे, जीवन बनसोडे, शंकर बनसोडे, महेंद्र बनसोडे, हनुमंत सोनवणे, संजय बनसोडे आणि अविनाश बनसोडे हे कार्य पाहणार आहेत. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून सोहम बनसोडे, यश शिंदे, अजय सरवदे, सुजित सोनवणे, रोहित कांबळे, वैभव ओहाळ आणि ऋषिकेश फले यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून आगामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जयंती उत्सव यशस्वी करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.