21 वर्षांत 25 वेळा बदली; तुकाराम मुंडे यांना पुन्हा तीन विभागांची जबाबदारी..

मुंबई | प्रतिनिधी राज्य प्रशासनात पुन्हा एकदा बदल्यांचा धडाका पाहायला मिळाला असून, 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये कडक व निर्णयक्षम अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंडे यांचाही समावेश आहे.

विशेष म्हणजे, मुंडे यांच्या कारकिर्दीतील ही आणखी एक बदली ठरली असून, गेल्या 21 वर्षांत तब्बल 25 वेळा त्यांची बदली झाली आहे. प्रशासनात इतक्या वारंवार बदल्या होणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.

सध्या दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी कार्यरत असलेल्या मुंडे यांच्याकडे आता आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य, तसेच महसूल व वन विभाग या तीन महत्त्वाच्या विभागांची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!