परंडा तालुक्यात ७ मार्चपासून ‘महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाचा श्रीगणेशा;महसूल सेवा आता थेट मंडळाच्या गावी दिव्यांग नागरिकांनी लाभ घ्यावा.

माझं गांव माझं शहर (प्रतिनिधी) परंडा तालुक्यातील महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ परंडा तालुक्यात राबवण्यात येणार आहे.

महसूल विभाग हा जनतेच्या दैनंदिन समस्या आणि जिव्हाळ्याच्या विषयाशी निगडित असल्याने, क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागातील सामान्य जनता, शेतकरी,विद्यार्थी व महिलांचे प्रश्न तातडीने मार्गी लावणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. परंडा तहसीलचे तहसीलदार निलेश काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,तालुक्यातील आसू, जवळा (नि), आनाळा, शेळगाव, सोनारी, परंडा आणि पाचपिंपळा या महसूल मंडळांमध्ये अभियान राबवण्यात येणार आसून आसू ७ मार्च, जवळा (नि). १४ मार्च, आनाळा २८ मार्च, शेळगाव १० एप्रिल, सोनारी १७ एप्रिल, परंडा ८ मे आणि पाचपिंपळा येथे १५ मे रोजी शिबिर घेण्यात येणार आहेत.

या शिबिरामध्ये नागरिकांना एकाच ठिकाणी अनेक शासकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये
प्रामुख्याने, प्रलंबित फेरफार निकाली काढणे, ७/१२वरील किरकोळ दुरुस्ती आणि डिजिटल ७/१२ रहिवासी, जात
मार्गदर्शन, उत्पन्न, आणि नॉन- क्रिमीलेअर प्रमाणपत्रांचे स्वीकारणे व वाटप करणे, सर्वांसाठी घरे अंतर्गत घरपट्टे वाटप,पी.एम. किसान योजना आणि सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे मंजुरी आदेश वितरण, ई-मोजणी, ग्रीस्टॅक, भूसंपादन व कृषीक(एनए)परवानगी प्रकरणातील कमी-जास्त पत्रके, तुकडेबंदी कायद्यांतर्गत १९६५ ते २०२४ कमी क्षेत्राच्या जमिनींच्या व्यवहारांचे गाव निहाय यादी वाचन, बळीराजा पाणंद रस्ते मार्गदर्शन आणि पोस्ट ऑफिसच्या नाविन्यपूर्ण विमा योजनांची माहिती दिली जानार आहे. नागरीकांनी आपल्या कागदपत्रांच्या त्रुटी दूर करण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी या शिबिरांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी संबंधित मंडळाचे मंडळ अधिकारी किंवा ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहान परंडा तहसीलचे तहसीलदार निलेश काकडे यांनी केले आहे.

error: Content is protected !!