घटनास्थळी पोलिस प्रशासन जाऊन पंचनामा केला .
परंडा (माझं गांव माझं शहर): परंडा येथील प्रीतम मंगल कार्यालयासमोर (दि २८ रोजी सकाळी १०.२०) उभा असलेल्या एका टेंपूवर (MH 45.AF 5121 हा नंबर चा टेंपू आहे . महावितरणचा विजेचा पोल कोसळल्याने भीषण अपघात झाला. या घटनेत टेंपूचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रीतम मंगल कार्यालयासमोर एक मालवाहू टेंपू उभा होता. यावेळी वाहतूक करणारा टिपर (MH08 W 8079) ओपन झाला आणि क्रॉसिंग तारा ओढत गेला यामुळे अचानक महावितरणचा विद्युत खांब या वाहनावर कोसळला. काही काळ वाहतूक ठप्प,खांब पडल्याने टेंपूच्या केबिनचा आणि वरील भागाचा चक्काचूर झाला आहे. ही घटना घडली तेव्हा वाहनात किंवा जवळ कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला.
महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह:
सदरील पोल जुना खिळखिळा झाला होता का, नवीन डांबरीकरण रस्ता करताना मध्यभागी ठेवून रस्ता काम करणाऱ्यां ठेकेदार यांनी काम केले काम करणाऱ्या ठेकेदारांनी यापूर्वी महावितरणला सूचना दिले आहेत का ! परंतु त्यांनी पोल साईटला केले नाही याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. महावितरणच्या अशा प्रकारच्या दुर्लक्षामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त करत होत आहेत
नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
सदरील बाधित वाहनधारकाने नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली असून, महावितरण व टिपर चालक यावर पोलिस प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.