परंडा(माझं गांव माझं शहर) माहिती अधिकार कार्यकर्ता महासंग यांनी दिलेल्या प्रत्रामध्ये असे म्हटले आहे की परंडा पंचायत समिती येथील विविध प्रलंबित मागण्यांसाठी परंडा पंचायत समितीमधील लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत ‘कामबंद आंदोलन’ पुकारले आहे. या आंदोलनामुळे तालुक्यातील प्रशासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प झाले असून, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
गेल्या काही दिवसांपासून लिपिक संवर्गातील कर्मचारी आपल्या न्याय्य हक्कासाठी आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत काम सुरू न करण्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. या आंदोलनामुळे पंचायत समितीत विविध कामांसाठी येणाऱ्या तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दूरवरून आलेल्या नागरिकांना आपली कामे न होताच रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने आंदोलस्थळी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी बोलताना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की, “प्रशासनाने या आंदोलनाची तातडीने दखल घेऊन लिपिक संवर्गाच्या मागण्या मान्य कराव्यात या निवेदनावर फारूक शेख कानिफनाथ सरपणे विजय मेहर विश्वास गूडे आमित आकरकर जमिर शिकलकर शिवाजी करळे किशोर येवारे धनंजय गोफने इत्यादी पदाधिकारीच्या सहया आहेत.