परंडा👉 पंचायत समिती आवारात अतिक्रमणांचा विळखा; गटविकास अधिकारी विनोद जाधव गप्प का?

परंडा(तानाजी घोडके) तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांचा कणा समजला जाणाऱ्या परंडा पंचायत समितीच्या मुख्य कार्यालयाच्या आवारात सध्या अतिक्रमणांचा अक्षरशः ‘धडाका’ सुरू असल्याचे चित्र आहे. कार्यालयाच्या परिसरात विविध ठिकाणी अनधिकृत बांधकामे आणि छोट्या टपऱ्यांनी पाय पसरले असून, यामुळे शासकीय कामात अडथळे येत आहेत. मात्र, या गंभीर प्रकाराकडे गटविकास अधिकारी (बि डी ओ) विनोद जाधव हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
नेमका प्रकार काय?
पंचायत समितीच्या आवारात मोकळ्या जागांवर काही दिवसांपासून अनधिकृतपणे व्यावसायिकांनी ताबा घेण्यास सुरुवात केली आहे. कार्यालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांना चालण्यासाठी जागा उरली नसून, शासकीय इमारतीच्या सौंदर्यालाही बाधा पोहोचत आहे. कर्मचारी निवासस्थाने आधीच खराब अवस्थेत असताना, आता मुख्य कार्यालयाचा परिसरही सुरक्षित राहिलेला नाही.


प्रशासनाचा ढिसाळ कारभार?
गटविकास अधिकारी हे पंचायत समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात. त्यांच्या कार्यालयाच्या नाकाखाली हे सर्व घडत असताना त्यांनी अद्याप कोणतीही कडक कारवाई केलेली नाही. “गटविकास अधिकारी गप्प का?” हा प्रश्न सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. राजकीय दबावामुळे की इतर कोणत्या कारणास्तव ही डोळेझाक सुरू आहे, अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत.
मागणी:शासकीय मालमत्तेचे संरक्षण करणे ही प्रशासनाची मुख्य जबाबदारी आहे. त्यामुळे तातडीने ही अतिक्रमणे हटवून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

अतिक्रमण केलेल्या टपऱ्या
error: Content is protected !!