मा. धनंजय दादा सावंत यांचा ‘होम टू होम’ प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

माझं गांव माझं शहर(तानाजी घोडके) जवळा जि. प.गटातील सिरसाव येथे दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सिरसाव गावात सौ. ज्योतीताई धनंजय सावंत यांचा गावभेट दौरा उत्साहात संपन्न झाला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी गावातील विविध भागांना भेट देत महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांच्याशी थेट संवाद साधला. गावातील समस्या, अपेक्षा व विकासाच्या मुद्द्यांवर त्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले.

याच दिवशी सायंकाळी मा. धनंजय दादा सावंत यांनी सिरसाव गावात होम टू होम प्रचार करत मतदारांशी थेट संपर्क साधला. प्रत्येक घरात जाऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधत आगामी निवडणुकीसाठी पाठिंबा मागितला. विकासकामे, पारदर्शक प्रशासन, रस्ते, पाणी, आरोग्य व शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

घराघरात जाऊन केलेल्या या प्रचारामुळे मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. “नेतृत्व थेट दारात येत असल्याने विश्वास वाढतो,” अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली. विशेषतः महिलांचा सहभाग लक्षणीय असून सौ. ज्योतीताई सावंत यांच्या उपस्थितीमुळे महिलांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

या दौऱ्यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. होम टू होम प्रचारामुळे सिरसाव गावात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, धनंजय दादा सावंत यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

error: Content is protected !!