परंडा नगर परिषद जनशक्ती नगर विकास आघाडीच्या मुख्य प्रतोद पदी रमेशसिंह परदेशी यांची एकमताने निवड..!

परंडा नगरपरिषदेच्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन केलेल्या ‘जनशक्ती नगर विकास आघाडी’ च्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा नुकताच परंडा येथील भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयात भव्य सत्कार करण्यात आला. या सोहळ्याच्या निमित्ताने परंड्यातील राजकीय वातावरण उत्साहाने न्हाऊन निघाले होते.

या सत्कार समारंभास माजी आमदार सुजितसिंह ठाकूर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल, माजी नगराध्यक्ष मुकुल देशमुख, माजी उपनगराध्यक्ष सुबोधसिंह ठाकूर, माजी नगरसेवक शब्बीरखॉ पठाण, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अड. जहीर चौधरी, भाजपा माजी जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, भाजपा नेते अजिम हन्नूरे, बाबासाहेब जाधव, रामदास गुडे, गौरव पाटील, सुरज काळे तसेच प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचे कौतुक केले.

शहराच्या विकासाची धुरा हाती घेणाऱ्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा आणि आघाडीच्या शिलेदारांचा यावेळी पुष्पहार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये खालील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला माजी उपनगराध्यक्ष इस्माईल कुरेशी, माजी नगरसेवक राहुल बनसोडे, नगरसेवक श्रीकृष्ण विधाते, रहमेतुल्ला पठाण, मन्नान बासले, नगरसेवक मदनसिंह सद्दीवाल, नगरसेवक समरजितसिंह ठाकुर, खाँजा पठाण, गणेश जाधव, रईस मुजावर, नगरसेवक अनिल शिंदे, सोमनाथ आलबत्ते, नगरसेवक अब्बास मुजावर, मजहर देहलूज, दत्तात्रय जाधव, समीर पठाण, नगरसेवक रमेशसिंह परदेशी, धनंजय सोनटक्के यांचा समावेश होतो.

यावेळी बोलताना उपस्थित नेत्यांनी विश्वास व्यक्त केला की, जनशक्ती नगर विकास आघाडीचे हे सर्व निर्वाचित प्रतिनिधी शहराच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडून पारदर्शक कारभाराच्या जोरावर परंडा शहराचा कायापालट करतील.

error: Content is protected !!