भाजपाच्या सौ.मोहिनी रामदास गुडे यांच्या उमेदवारीची प्रबळ दावेदार म्हणूण चर्चा …
परंडा (दि ७जानेवारी) आगामी काळात होऊ घातलेल्या पंचायत समिती निवडनुकीसाठी वडणेर पंचायत समिती गण हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आसुन या गणातून भाजपाच्या वतीने आवार पिंपरी येथील मा.आ.सुजितसिंह ठाकुर यांचे विश्वासु सहकारी व भाजपा युवा मोर्चा ता.सरचिटणीस रामदास गुडे यांच्या सौभाग्यवती सौ.मोहिनी रामदास गुडे या निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक असून त्यांनी मा.आ.तथा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक प्रमुख सुजितसिंह ठाकुर यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे.
रामदास गुडे यांनी सौभाग्यवती मोहिनी गुडे यांच्यासाठी वडणेर पंचायत समिती गणातून भाजपाची उमेदवारी मिळावी
यासाठी पक्षाकडे जोरदार फिल्डींग लावली असून निवडणुक लढवण्याची तयारी देखील सुरू केली आहे.परंडा तालुक्यातील वडणेर पंचायत समिती गण हा महत्वाचा आणि राजकीय सत्ता केंद्र म्हणून ओळखला जातो सध्या या गनातुन पूर्वीचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे पक्षाचे व सद्याचे शिवसेना शिंदे गटाचे गुलाब शिंदे हे प्रतिनिधित्व करत आहेत.परंतु आगामी निवडनुकीसाठी भाजपाकडून आवार पिपरी येथील रहिवाशी,भाजपा युवा मोर्चा ता.सरचिटणीस रामदास गुडे यांनी सौभाग्यवती सौ.मोहिनी गुडे यांच्यासाठी मा.आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या उमेदवारीची मागणी केली आहे.
जर महायुतीत बिघाडी झाली किवा प्रत्येक पक्षाने एकला चलो ची भुमिका घेतली तर सौ मोहिनी रामदास गुडे यांची वडणेर पंचायत समिती गणातून भाजपा पक्षाची उमेदवारी निश्चीत मानली जात आहे.सध्या तरी सौ.मोहिनी रामदास गुडे या भाजपा कडून वडणेर गणातून तीकीटाच्या प्रबळ दावेदार माणल्या जातात त्यातच मा. आ.सुजितसिंह ठाकुर यांच्याकडे धाराशिव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक प्रमुख म्हणून जबाबदारी आसल्याने सौ. मोहिनी गुडे यांना पक्षाची उमेदवारी मिळणे सहज शक्य असल्याचे वडणेर पंचायत समिती गणातील नागरी कातून बोलले जात आहे.