परंडा येथे हजरत ख्वॉजा बद्रोद्दीन चिश्ती उरूसानिमित्त कलश, संदल मिरवणूक उत्साहात..

परंडा(प्रतिनिधी) शहर व परिसरातील हिंदू मुस्लीम धमीर्यांचे श्रद्धास्थान असलेल्या शहरातील सुफी संत हजरत ख्वॉजा बद्रोद्दीन चिश्ती शहीद रहेमतुल्लाह अलैह यांच्या ७०६ व्या उरुसानिमित्त सोमवारी (दि. २९) भक्तीमय वातावरणात स. १० वा. कलश मिरवणुक व सायंकाळी ६ वा. संदल मिरवणुकीस उत्साहात हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत सुरुवात झाली.
शहरात हजरत ख्वॉजा बद्रोद्दीन चिश्ती यांचा ऊरूस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी ऊरूस कमेटीच्या वतीने २८ डिसेंबर ते १ जानेवारी या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त २८ डिसेंबर रोजी मध्यरात्री दर्गाहची सेवा करणाऱ्या मुजावर बंधुकडुन मजारची गुसलखानी व संदल माली केल्यावर सुगंधी फुलांची चादर चढवून ऊरुसा निमीत्त आयोजित मुख्य धार्मिक विधीचा शुभारंभ करण्यात आला.

२९ डिसेंबर रोजी स. १० वाजता दर्गाह कलशाला कलई करण्याचा मान असलेल्या मोमीन गल्लीतील इब्राहिम बाडीवाले यांच्या निवासस्थानी सोनेरी मुलामा देऊन चकचकीत, चमकदार केलेल्या कलशाची फटाक्यांच्या अतिषबाजीत भाविक भक्तांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुक मंडई पेठ मार्गे दर्गाह येथे पोहोचल्यानंतर हा कलश दर्गाहच्या शिखरावर बसवण्यात आला. यानंतर दुपारी ४ वाजता दर्गाहचे प्रमुख मुतावल्ली युनुस आलम सिद्दीकी यांच्या मुजावर गल्ली येथील निवासस्थानावरून फुलांची चादर व गिलाफ परंपरेने मान असलेल्या गणेशसिंह सद्दीवाल यांच्या मानाच्या घोड्यावर टाकल्यानंतर ही मिरवणुक सवाद्य तहसिल कार्यालयात पोहचली. याचवेळी मंगळवार पेठेतील मुजावर गल्लीतुन मानाची फुलांची चादर व गिलाफ तहसिल कार्यालयात दाखल झाली. या प्रसंगी ऊरुस कमेटीच्या वतीने विविध क्षेत्रातील उपस्थित असलेल्या मान्यवरांचा फेटा बांधुन सत्कार करण्यात आला.
यावेळी नायब तहसिलदार विजय बाडकर, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, नगराध्यक्ष जाकीर सौदागर, माजी नगराध्यक्ष मुकुल देशमुख, माजी उपसभापती मेघराज पाटील, रिपाईचे प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे, शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख रणजीत पाटील, उद्योजक काका साळुंके, माजी उपनगराध्यक्ष ईस्माईल कु रेशी, काँग्रेसचे नेते अॅड. नुरुद्दीन चौधरी, अॅड. जहीर चौधरी, युवा नेते विश्वजित पाटील, नगरसेवक रमेशसिंह परदेशी, डॉ. अब्बास मुजावर, समरजितसिंह ठाकूर, बाशाभाई शहाबफीर्वाले, मन्नान बासले, वाजीद दखणी, शरीफ तांबोळी, तनवीर मुजावर, समिर पठाण, शब्बीरखाँ पठाण, जावेद पठाण, अझहर शेख, सत्तार पठाण, मकसुद पल्ला, संजय कदम आदी मान्यवर उपस्थीत होते.
तहसिल कार्यालयातुन ना. तहसिलदार यांच्यासह मान्यवरांच्या डोक्यावर आणलेल्या फुलांच्या चादरी व गिलाफ मानाच्या घोड्यावर टाकल्या नंतर हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत संदल मिरवणुक परंडा शहर निघाली. ही संदल मिरवणुक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, टिपु सुलतान चौक, महात्मा फुले चौक, कुर- बाड गल्लीतुन कुरेशी गल्ली मार्गे सुफी संत हजरत ख्वॉजा बद्रोद्दीन चिश्ती शहीद रहिमतुल्लाह अलैह या दर्गाह येथे पोहचली. मानाच्या घोड्याने दर्गाहच्या पायऱ्या क्षणात पार करून हजरत खाँजा बद्रोद्दीन चिश्ती सलामी दिली. हा आकर्षनिय क्षण पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर फटाक्यांची नेत्रदीपक आतिषबाजी करण्यात आली तसेच फातेहखानी नंतर महाप्रसाचे वाटप करण्यात आले.

ऊरुसानिमित्त आज ३१ डिसेंबर रोजी ४ वाजता जुनी तहसील ते मंडई पेठपर्यंत बा-रागाड्या ओढण्याचा कार्यक्रम, सायंकाळी ८ वाजता आठवडा बाजार मैदानात मुशायरा कवि सम्मेलन व १ जानेवारी रोजी भक्ती गितांच्या कार्यक्रम होणार आहे या सर्व कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ऊरूस कमेटीच्या वतीने केले आहे.

error: Content is protected !!