भोंजा येथे शेतकरी व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थित; केळी व तुती उत्पादक शेतकरी परिसंवाद संपन्न.

परंडा(माझं गांव माझं शहर) भोंजा हवेली एक खेडे गाव असून ९० टक्के कोरडवाहू शेतकरी बनले बागायतदार ऊस शेती ला बगल देऊन केळी व तुती उत्पादनात अधिक भर देऊन शेतकरी मनरेगा अंतर्गत होतायत लखोपती म्हणूनच जिल्याची यंत्रणा जिल्हा अधिकारी डॉ किर्ती कीरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनांक घोष, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री राजकुमार माने, जिल्हा प्रकल्प अधिकारी श्री मिसाळ, उपविभागीय कृषी अधिकारी श्री भागवत सरडे, जिल्ह्याचे सुमीत सोनटक्के, रेशीम अधिकारी वाकुरे मॅडम, तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे थेट शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांच्या संपूर्ण टीम ला घेऊन धावून गावातील अधिकाधिक शेतकऱ्यांना उत्पादनात खर्च कमी उत्पन्न वाढावे यासाठी नैसर्गिक जैविक शेंद्रीय शेती ची तयारी आणखीन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी राबवावी यावेळी केळी लागवड व्यवस्थापन सोमनाथ हुलगे संबोधित करताना म्हटले की शेतकऱ्यांनी न खचता केळी लागवडीकडे वळून शेतीत आलटापालट पिके घ्यावीत केळी डबल दोन ओळीत ठिंबक सिंचनाचा वापर करावा यामुळे अधिक उत्पादन मिळते. तसेच के डी एक्सपर्ट चे सर्वेसर्वा किरण डोके यांनी देखील केळी ही शेतकरी लाभार्थी यांना परवडणारी फळबाग असुन कमी पाण्यात रोगराईला बळी न पडणारी टीशू कल्चर रोपे निवडून शेतीत लागवड करावी निर्यात व स्टोरेजची हमी आम्ही घेऊ असे आश्वासन दिले तर जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शेतात शेतकऱ्यांनी AI द्वारे क्रांती घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावे व मनरेगा अंतर्गत फळबाग, तुती, सिंचन विहीर, भाऊसाहेब फुंडकर योजना, महिडीबीटी अंतर्गत शेती ला लागणारे सर्व साहित्य घेऊन शासकीय सबसिडी चा लाभ घ्यावा तसेच थेट शेतात जाऊन रणनवरे यांच्या तुतीची लागवड तर मोरे यांच्या शेतात केळी लागवड करून शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आणि या छोट्याशा खेड्यात गावातून श्री पाटील बुवा जिल्हा परिषद प्रोडुसर कंपनी तयार झाली अभिमानास्पद असुन या कंपनी अंतर्गत आता गावातच माती परीक्षण केंद्राची देखील सोय होणार असून डायरेक्टर गणेशदादा नेटके यांच्या श्री गणेश बॅंक सेवा केंद्र येथे भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी सरपंच सौ राणी समाधान कोळी, उपसरपंच आकुबाई शिवाजी घाडगे, तहसीलदार निलेश काकडे, गटविकास अधिकारी मोहन राऊत, तालुका कृषी अधिकारी भुम अतुल ढवळे, तालुका कृषी अधिकारी लोहारा महेश देवकाते, तालुका कृषी अधिकारी उमरगा ज्ञानोबा इतापुरे, तालुका कृषी अधिकारी तुळजापूर आबासाहेब देशमुख, तालुका कृषी अधिकारी वाशी राजाराम बरवे, मंडळ कृषी अधिकारी संभाजी माळी, मंडळ कृषी अधिकारी शामनंदन फरतडे, मंडळ कृषी अधिकारी सुनिल थोरबोले, पर्यवेक्षक बी. हांगे, पर्यवेक्षक मनोज पाटील, सर्व उप कृषी अधिकारी, सर्व सहायक कृषी अधिकारी व विनोद भाग्यवंत व आजीमाजी सरपंच उपसरपंच व मोठ्या संख्येने प्रतिष्ठित नागरिक बचत गटाच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या तर सुत्रसंचालन शाहीर शरद नवले तर आभार प्रदर्शन सहायक कृषी अधिकारी रेषमा कामटे यांनी मानले आणि स्नेह भोजनाचे अन्नदाते सुखी भव यासाठी गावातील मोठ्या संख्येने युवाकांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!