मा.आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या विषेश प्रयत्नाने कृष्णा गुडे यांच्या वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधितून ३ लाख रुपयाचा निधी मंजूर .

परंडा(प्रतिनिधी) परंडा तालुक्यातील गुडे कुटुंबातील रुग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य मिळवून दिल्याबदल गुडे कुटूंब व आवर पिंपरी ग्रामस्थांनी मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री साह्यता निधी प्रमुख रामेश्वर नाईक व मा.आ.सुजितसिंह ठाकूर याचे मानले आभार. . .

आवार पिपरी येथील युवक कृष्णा विष्णु गुडे यांच्या बोन मॅरो टॉन्सप्लॉट या आजारावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी त्यास त्याच्या कुठूंबीयांनी सह्याद्री हॉस्पिटल येरवडा पुणे येथे ऍडमिट केले आहे.त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सह्यद्री हॉस्पीटलने २८ लाख रुपये येणार आसल्याचे सांगीतले आहे. कृष्णा गुडे च्या कुंठूबाची आर्थिक परिस्थिती हालाकीची व अल्पभूदारक शेतकरी कुटूंब आसल्याने कृष्णा गुडे याच्या वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मंजुर करून द्या आशी भाजपाचे कार्यकर्ते रामदास गुडे यांनी यांनी मा.आ सुजितसिंह ठाकुर यांनी कृष्णा गुडे यांच्या कुठूबीयांच्या आर्थीक परिस्थितीचा विचार करून त्याचा वैद्यकीय खर्च भागविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून रु. ३ लाख रुपये इतके अर्थसहाय्य कृष्णा गुडे यांच्या उपचारासाठी मंजूर करून देण्यात आले आहेत.
कृष्णा गुडे यांच्या वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधितून देण्यात आलेली ३ लाखाची रक्कम आत्तापर्यन्तच्या धाराशिव जिल्ह्यात देण्यात आलेल्या रक्कमे पेक्षा सर्वात मोठी रक्कम आहे.
कृष्णा गुडे याच्या उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधिचीची रक्कम वेळेत मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता प्रमुख रामेश्वर नाईक,मा.आ.सुजितसिंह ठाकुर यांचे गुडे कुठूंबीय व आवार पिपरी ग्रामस्थांनी मानले आभार .

error: Content is protected !!