एका शेतकऱ्याला गंडा घातल्याची घटना ; परंडा भोंजा परिसरात चर्चा.

दि. ११- शेतात सालगडी राहण्यासाठी तिघांनी तीन लाख ५० हजारांची उचल घेऊन एका शेतकऱ्याला गंडा घातल्याची घटना परंडा तालुक्यातील भोंजा येथे घडली आहे. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात मध्य प्रदेशातील तिघांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्य प्रदेश राज्यातील बडवाणी जिल्ह्यातील जगन चव्हाण, दिनेश सरदार कोणजे व लाला बुट्या चव्हाण या तिघांनी २२ ऑक्टोबर रोजी भोंजा येथील अजित विश्वास नेटके यांच्या शेतात सालगडी राहतो म्हणून तीन लाख ५० हजार रूपये उचल घेतली. मात्र, काम न करता तिघेही गुपचूपपणे निघून गेले. याप्रकरणी अजित नेटके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!