परंडा (प्रतिनिधी) तालुका व शहरातील दिव्यांग बांधवांची कार्ड प्रमाणपत्र तपासणी शिबिर धाराशिव येथील तज्ञ डॉक्टर यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली
यामध्ये अस्थिभंग दिव्यांग ३५ तपासणी डॉ.स्वामी कृष्णा यांनी कामकाज पाहिले , मतिमंद दिव्यांग १७ तपासणी करिता डॉ. सुहास शिंदे यांनी कामकाज पाहिले, अंध ९ यांची तपासणी करण्यासाठी पवन महाजन यांनी कामकाज पाहिले अशा एकूण दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी ६२ दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली. ही तपासणी करण्यासाठी दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीने नेहमी पाठपुरावा करून दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी संस्थेचे राज्याध्यक्ष तानाजी घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज पूर्ण होत आहे.
हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी सरकारी दवाखाना येथील कर्मचारी, एक्स-रे विभाग व दिव्यांग उद्योग समूहातील पदाधिकारी तानाजी सांगडे, उत्तम शिंदे , रणजित परदेशी दिव्यांग विशेष शिक्षक हजगुडे, बेडके यांचे लहान मुलांना घेऊन येण्यासाठी सहकार्य लाभले .