परंडा दि . १ : – परंडा नगरपालिका निवडणुक ही शिवसेना शिंदे विरुद्ध सर्वपक्षिय जनशक्ती नगरविकास आघाडी यांच्यात खरी लढत होत आहे . दि.१ रोजी जनशक्ती नगर विकास आघाडीची आठवडी बाजार येथे सर्वपक्षिय जनशक्ती आघाडीची सभा हास्य कल्लोळात गाजली . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार राहूल मोटे यांना आजी आमदार कॉर्नर सभेत बुटका म्हणाले तेव्हां राहूल मोटे यांनी त्यांना नकटा म्हणालो नाही . तेव्हां श्रोत्यात हास्यकल्लोळ करत खेकडा , खेकडा अशा गर्जना केल्या . (टाळ्या व हास्यकल्लोळ ) विद्यमान आमदार हे खाजगी संस्थेत नोकरी करत होते तेव्हां मी भूम परंड्याचा आमदार होतो . विकास काय आहे , कसा करायचा , हे मी चांगल जानतो असा चिमटा घेतला . तर माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल यांनी शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगराध्याचे नाव न घेता तुझी उंची किती ? तू बोलतो किती ? ( टाळ्या )भ्रष्टाचार , गुंडगिरी , दहशत निर्माण करणे याशिवाय तुला कळतयच काय ? मी नगराध्य होतो , माजी आमदार सुजितसिंह नगराध्यक्ष होते , मुकूल देशमूख , रमेश परदेशी , सुभाष शिंदे यांच्या अर्धांगिणी , शिवाजी मेहेर हे नगराध्यक्ष असताना परंडा शहरात वातावरण शांतता प्रिय होतो .
सध्या भ्रष्टाचार अन् गुंडगिरी , वाढली आहे असे सांगितले . माजी नगराध्यक्ष यांनी सांगितले आम्ही निस्थार्थपणे नगरपालिकेचा कारभार केला स्वार्थासाठी लोकांच्या रक्ताची रंगपंचीम साजरी केली नाही असे खमंग टिकास्त्र सोडले . शिवसेना उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख रणजितदादा पाटील यांनी नगरपालिका आणि शहराच्या विकास आणि सर्वपक्ष , जातीधर्म यांचा सलोखा राखणाऱ्या वक्तव्याची क्लिप वाजऊन दाखवली आणि आपले लहाण बंधू विश्वजित पाटील यांना नगराध्यक्ष पदी बसण्याची एक संधी द्या अशी मतदारांकडे याचना केली .
विधानपरिषदेचे माजी सदस्य सुजितसिंह ठाकूर यांनी नगरातील विकासाची दिशा आणि दशा यावर प्रखर हल्ला करून आम्ही सर्व पत्र एकत्र आलो ते परंडा शहरातील भस्मासूर संपविण्या साठी आलो आहोत . विकासाच्या नावावर फार मोठे झाले . त्यांची पंधरा वर्षापूर्वीची प्रॉपर्टी आणि आताची प्रॉपर्टी याचा तपास व्हायला पाहिजे . एवढी संपत्ती आली कुठून तर ठेकेदारी , भ्रष्टाचार , दहशत , गुंडीगिरी , निकृष्ठ कामे करूनच आली .
परंड्याचा विकास करण्यासाठी आम्ही एकत्र आलोत , इथला भस्मासूर गाढण्यासाठी . तेव्हां त्याची जगा त्यांना दाखऊन द्यायचे काम मतदार बंधूनो तुमचे आहे . असे आव्हान केले . वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रविण रणबागूल यांनी या सर्वपक्षीय जनशक्ती नगरविकास आघाडीवर संपूर्ण विश्वास ठेऊन त्यांचे सोबत राहून भ्रष्ट राजकाऱ्यांना त्यांची जागा दाखऊ आम्ही सर्वासोबत आहेत . शहराचा विकास हा मूद्दा आज म्हहत्वाचा असून छत्री या चिन्हावर बटन दाबून सहकार्य करावे असे मतदारांना आव्हान केले .
या सभेची तुफान गर्दी पाहता विरोधकाचे धाबे तर दणाणणार असे प्रचंड दांडग्या सभेच्या तुफान गर्दीने दाखऊन दिले अशी परस्थिती निर्माण झाली या सभेला महिलांची उपस्थिती विशेष होती.